नगरसेवक चषकाचा मानकरी ठरला मोहप्रे संघ

। महाड । प्रतिनिधी ।
नगरसेवक संदिप जाधव पुरस्कृत आणि साई प्रतिक्षा सरेकर आळी आयोजित मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पधेत मोहप्रे संघाला विजेतेपद तर करंजखोल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे, तर तृतीय क्रमांक श्रेअस जगताप मित्र मंडळ तुडील याने पटकाविले. महाडमधील चांदे क्रिंडागण येथे दि 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान मर्यादित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेच भव्य आयोजन करण्यात आल होते. या स्पर्धेत एकुण 32 संघानी भाग घेतला होता. बाद फेरीच्या स्पर्धेत अंतिम सामना मोहप्रे आणि करंजखोल संघात झालेल्या सामन्यात मोहप्रे संघ विजेता ठरला. प्रथम क्रंमाक 30 रुपये रोख आकर्षक चषक दृतीय 20 हजार आकर्षक चषक तृतीय श्रेअस जगताप मित्र मंडळ तुडील 10 हजार चषक तसेच या स्पधेत बेस्ट बॅस्टमन प्रथमेश, बेस्ट बॉलर हार्शी, मालिकावीर तुषार पाटील यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिकेत कदम, ॠषीकेश यादव, भूषण सावंत, दिलीप ठाकूर, साहिल धाडवे, ओम यादव, प्रथमेश उमासरे, गणेश पवार, विनय कळमकर, अनंत साळुसे, विजय साळूंखे, सुरज हाटे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version