। चिरनेर । प्रतिनिधी ।
बालेवाडी पुणे येथील प्रतिष्ठित श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल जलतरण तलाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 14 वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये उरण-करंजा नेव्हल स्टेशन चिल्ड्रन स्कूलचा विद्यार्थी मोहित संदीप म्हात्रे यांने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेचे पुण्यात आयोजित करण्यात आली होती. 4 ते 8 नोव्हेंबर रोजी विविध वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत राज्यातील विविध शाळेतील सुमारे 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई व रायगड विभागातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले असून उरण-करंजा नेव्हल स्टेशन चिल्ड्रन स्कूलचा विद्यार्थी मोहित संदीप म्हात्रे हा विद्यार्थीही सहभागी झाला होता.
महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात सहभागी झालेल्या मोहित म्हात्रे यांने एकाच वेळी 50 मीटर फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक या तीन इव्हेंटमध्ये तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.
मोहितच्या या तिहेरी सुवर्णमय कामगिरीबद्ल उरण-करंजा नेव्हल स्टेशन चिल्ड्रन स्कूलचे शिक्षक, पदाधिकारी व विद्यार्थीनी कौतुक केले. शाळेचे पीटीआय शिक्षक प्रकाश धसाडे आणि सुप्रिया पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या प्रयत्नातून रोहितने सुवर्णपदके पटकावली असल्याची प्रांजळ प्रतिक्रिया पालक संतोष म्हात्रे यांनी व्यक्त केली.