मोहोपाडा बाजारपेठ होळीनिमित्त सजली

आकर्षक पिचकाऱ्यांसह साखरमाळांनाही पसंती

| रसायनी | वार्ताहर |

होळीचा सण काही तासांवर आल्याने मोहोपाडा बाजारपेठ सजली आहे. यंदा लहानगे गॉगल पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग, टी शर्ट्‌‍सने बाजारपेठ सजली आहे. तर, मुखवट्यांमध्ये पक्षी, प्राणी, कॉमिक्समधील हिरो, कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल आहे.

क्रिश चित्रपटातील गॉगल पिचकारीला लहान मुले, तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे. पारंपरिक पिचकाऱ्यांसह पंपाद्वारे पाणी सोडणाऱ्या विविध रंगी लहान-मोठ्या आकाराच्या 50 ते हजार रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या मोहोपाडा बाजारात दिसत आहेत. रासायनिक रंगासह मोहोपाडा बाजारपेठेत विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे यांना ग्राहकांकडून मागणी आहे. तसेच मोहोपाडा बाजारपेठेतील विनायक डुकरे यांनी होळीनिमित्त साखरमाळा बाजारात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. होळीमातेला तसेच शिमग्यात लहान मुलांच्या गळ्यात साखरमाळ घालण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा असल्याने बाजारपेठेत साखरमाळ मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

Exit mobile version