| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील अंजुमन इस्लाम काळसेकर महाविद्यालयातील 19 वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार रियाज रशीद पठाण (40) रा. इको इस्टेट, खर्डी रोड, मुंब्रा या शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. कामोठे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
