| पेण | प्रतिनिधी |
पेण-वाशीवली परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून छेडछाड केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी टपरीवर एकटी बसलेली असताना आरोपीने तिच्याशी जवळीक साधत “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे” असे सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतरही आरोपीने तिच्यावर दबाव आणत मोबाईल देण्याचे आमिष दाखवले आणि लपून-छपून संपर्क ठेवण्यास सांगितले. यानंतर आरोपीने मुलीचा हात धरून तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेल्यावर आरोपी व त्याच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
