बिरवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला धमकावल्याप्रकरणी एका 25 वर्षीय महिले विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बिरवाडी येथील एका घरात ही घटना घडली आहे. भाग्यश्री नितीन गोधावडे राहणार बापटनगर, बिरवाडी असे महिला आरोपीचे नाव असून, या महिलेने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलीच्या आईला ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. ‌ याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित महिला आरोपी विरोधात शनिवारी (दि.27) महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फाळके या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version