सात वर्षीय मुलीचा विनयभंग 

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा भागात राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारच्या इमारतीत जाऊन तेथील सातवर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिसांनी या अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग तसेच पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील अल्पवयीन मुलगा तळोजा फेज-2 भागात राहण्यास आहे. तो रविवारी (दि.13) सायंकाळी खेळता खेळता बाजूच्या इमारतीत गेला होता. या वेळी त्याने या ठिकाणी खेळत असलेल्या सातवर्षीय मुलीला पकडून उद्वावाहनाच्या ठिकाणी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर हा मुलगा पळून गेल्यानंतर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तळोजा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या मुलाविरोधात विनयभंग व पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version