| पनवेल | वार्ताहर |
तळोजा येथील भुयारी मार्गातून पायी चालत जाणार्या 22 वर्षीय तरुणीशी एका अज्ञात तरुणाने भुयारी मार्गामध्ये अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील पीडित तरुणी मिरारोड येथे राहण्यास असून, ती तळोजा येथे कामानिमित्त आली होती. सकाळी 9 वाजता पीडित तरुणी तळोजा पाचनंद रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर भुयारी मार्गातून पायी चालत जात होती. रस्ता चुकल्याचा समज झाल्याने तिने एका तरुणाला तळोजा फेज-2 कडे जाण्याचा रस्ता विचारला. यावेळी तरुणाने पीडित तरुणीला रस्ता चुकल्याचे सांगितले. त्यानुसार तरुणी बाहेर जात असतांना, या तरुणाने मागून तरुणीला पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. याबाबत तरुणीने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे नागरिक तिच्या मदतीला धावून आले. दरम्यान या घटनेतील आरोपी हा पसार झाला आहे.