| पनवेल | वार्ताहर |
उलवेमध्ये बस स्टॉपवर बसची वाट पाहणार्या तरुणीचा अज्ञात इसमाने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने तिचा विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तरुणावर न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अनोळखी आरोपी हा 20 ते 25 वर्ष वयोगटाचा असून रंगाने सावळा, उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, केस वाढलेले, कपाळ मोठे, अंगात लाल रंगाचा गोल गळ्याचा फुल टी शर्ट, हिरव्या रंगाची फुल पॅन्ट तसेच पायात चप्पल घातलेली आहे. या आरोपीची माहिती मिळण्यासाठी पोलिसांकडून त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे व या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक महावीर जाधव (मो.नं. 9822461631) तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार (मो.नं.9890689894) येथे संपर्क साधावा.