महिलेला छेडणे पडले महागात

|रायगड । जिल्हा प्रातिनिधी

महिलेच्या ओळखीचा फायदा घेत ब्लॅक मेल करणाऱ्याला अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 12 जुलै पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे महिलेला छेडणे आरोपीला चांगलेच महागात पडले.

हा आरोपी लातूर मधील असून महिला रायगड जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयात असल्याची चर्चा आहे. मात्र या बाबत अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

पिडीत महिलेसोबत आरोपीची परराज्यातील एका ऑटो रिक्षा स्टँड परिसरात ओळख झाली. त्याचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करणे तसेच व्हॉट्सॲप व्हिडीओ तसेच साधे कॉल करून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल कृत्य केले. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार आला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी तपासाचे सूत्र वेगात हालवली. अखेर लातूर मधून त्याला त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version