| आशियाई | वृत्तसंस्था |
सिंगापूरविरुद्ध मंगोलियन संघ दहा धावांत ऑलआऊट झाला आहे. आंतरराष्ट्रीय -20 मधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी आयल ऑफ मॅनचा संघही याच धावसंख्येवर ऑलआऊट झाला होता.
टी -20 विश्वचषकाच्या आशियाई पात्रता सामन्यात सिंगापूरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने मंगोलियन संघाला 10 षटकांत 10 धावांत ऑलआउट केले. सिंगापूरने 11 धावांचे लक्ष्य अवघ्या 5 चेंडूत एक विकेट गमावून पूर्ण केले. हा सामना फक्त 65 चेंडूंपर्यंत चालला.17 वर्षीय लेगस्पिनर हर्ष भारद्वाजने 3 धावांत 6 बळी घेतले. तसेच अक्षय पुरीने 2, राहुल आणि रमेश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मंगोलियन संघ यंदा तिसर्यांदा 20 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला आहे. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगविरुद्ध 17 धावांवर आणि मे महिन्यात जपानविरुद्ध 12 धावांवर संघ ऑलआऊट झाला होता. 11 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सिंगापूर संघाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. येथे कर्णधार मनप्रीत सिंग शून्यावर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या राऊल शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा विल्यम सिम्पसनने पहिल्याच षटकाच्या 5 व्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. मंगोलियाने आता सर्व 4 सामने गमावले आहेत. हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.