मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस बंद

उरणमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा

उरण I दिनेश पवार I

मोरा बंदरात सोमवारी धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. यामुळे सोमवारी संध्याकाळपासून मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस बंद केल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी पी.बी. पवार यांनी दिली.

खराब हवामान आणि पावसाचा फटका येथील सागरी प्रवासी वाहतुकीलाही बसला. मोरा बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सोमवारी संध्याकाळपासूनच बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने घेतला आहे. या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी पी.बी. पवार यांनी दिली. तसेच करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. उरण परिसरात पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.

Exit mobile version