दहा तालुक्यांत 50 टक्केपेक्षा अधिक मतदान

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी स्वयंस्फुर्ती पुढे येत मतदान करण्यास उत्साह दाखविला. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत 32.84 टक्के मतदान झाले. एकूण 1 लाख 25 हजार 29 मतदारांनी मतदान केले. त्यात महिला 61 हजार 671 व पुरुष 63 हजार 358 मतदारांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत 52.09 टक्के मतदान झाले. त्यात 1 लाख 500 महिला व 97 हजार 818 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, उरण, सुधागड, माणगाव, तळा, पोलादपूर व महाड तालुक्यांमध्ये 50 ते 71 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Exit mobile version