| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील प्रथितयश डॉक्टर अशोक हरी कर्वे यांचा सोमवारी ( 2 जानेवारी) पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला.मॉर्निंगवॉक वरून परतत असताना कर्वे यांना धडक देऊन वाहन चालक वाहनांसह पळून गेला. त्या अज्ञात वाहनाची धडक इतकी जोरदार होती कि डॉ कर्वे यांचे त्याच ठिकाणी निधन झाले आहे. नेरळ पोलिसांनी स्थानिक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
80 वर्षीय डॉ कर्वे हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दररोज घरातून बाहेर पडायचे आणि त्यानंतर तासभर मॉर्निंग वॉक करून आपल्या ब्राह्मण आळी येथील घरी परतायचे.आज ते नेहमीच्या मार्गावर न जाता नेरळ कर्जत रस्त्याकडे मॉर्निंग वॉक साठी गेले होते. नेरळ पेट्रोल पंपाच्या पुढे जाऊन पुन्हा घराकडे परतत असताना एलएइएस शाळेच्या पुढे आणि तुळशी कार्यालयाच्या मध्यभागी राज्य मार्ग रस्त्याने नेरळ गावाकडे डॉ कर्वे येत होते.त्यावेळी त्यांच्या पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि पायाला थोडे खरचटले होते.सकाळी मॉर्निंग वॉक साठी मोठ्या प्रमाणात नेरळकर घराबाहेर पडलेले असतात आणि त्यामुळे अपघातानंतर काही मिनिटेच ही घटना आजूबाजूने जाणार्या वाटसरूंना समजल्याने त्यांच्या अपघाताची माहिती कळली.
त्यांचा मृतदेहाचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर नेरळ येथील स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना दोन पुत्र असून ते दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. मोठा मुलगा लंडन मध्ये असून तो भारतात परतण्यास निघाला आहे. दुसर्या मुलाचे नेरळ आणि चौक येथील क्लीनिक आहेत.तर त्यांच्या पेरणी आणि सुनबाई या देखील डॉक्टर आहेत. नेरळ येथे कर्जत मेडिकल असोसिएशन मधील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.तर या अपघाताची तक्रार डॉ हेमंत शेवाळे यांनी पोलिसात दिली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे अधिक तपास करीत असून अपघात घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले जात आहेत.