| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आंबेपूर-पेझारी येथील उपक्रमशील मॉर्निंग वॉक ग्रुपचा दहावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहेत. या पुरस्कार्थांमध्ये माजी आमदार पंडित पाटील, माजी रा.जि.प. सदस्या भावना पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अँड. आस्वाद पाटील, प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, झेपच्या अध्यक्षा डॉ. चित्रा पाटील, सुप्रभातचे संचालक सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमन पाटील, साहित्यिक-पत्रकार उमाजी केळुसकर यांच्यासह खेळुराम विठू भोईर, पांडुरंग गजाजन पाटील, के.डी. म्हात्रे, सुरेश मारुती पाटील, अनिल गजाजन पाटील, राजाराम चांगू धुमाळ, कमळाकर महादेव पाटील, सहदेव जोमा पाटील, रामचंद्र देवजी म्हात्रे यांना विविध क्षेत्रातील नेत्रदीपक कार्याबद्दल सन्मानित केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे, मोहन मंचुके, जी.सी. पाटील यांनी दिली. या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली.