। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील गुळसुंदे येथे भाड्याने राहणारी अनिता मनिप गोंड (25) ही तिच्या तीन वर्षांच्या मुलास घेऊन बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात पती मनिप रिंकू गोंड याने हरविल्याची तक्रार केली आहे.
गुळसुंदे येथील राहत्या घरातून अनिता मनिप गोंड मुळ रा. जगदीशपुर-उत्तरप्रदेश, सध्या राहणार गुळसुंदे ही कोणास काही एक न सांगता मुलगा आर्यंन यांस घेऊन गेली आहे. तिचा शोध घेऊनही ती व मुलगा आर्यंन अद्याप सापडला नाही. अनिता मनिप गोंड ही रंगाने गोरी, अंगाने मध्यम, उंची पाच फुट, चेहरा गोल, अ़ंगात राखाडी रंगाची साडी परिधान केली असून, पायात चप्पल, सोबत तीन वर्षांचा आर्यंन मुलगा तसेच बॅग असून त्यामध्ये तिचे व मुलाचे कपडे आहेत. याप्रकरणी रसायनी पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल झाली असून, कोणास आढळल्यास महिला पोलीस सोनम शेळके मो-8793163343, रसायनी पोलीस स्टेशन मो-8530449695 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गुळसुंदे येथून मायलेक बेपत्ता
