धारावीमध्ये सुनेकडून सासूची हत्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।
धारावीत सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नवर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथोनी मुथुस्वामी (61) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अथोनी यांच्या हत्येप्रकरणी सून शांती मुरगन (37) हिला पोलिसांनी अटक केली आहे. अथोनी मुथुस्वामी यांना हृदयात वॉलचा त्रास असल्याने उपचारासाठी डॉक्टरांनी तीन लाखांचा खर्च सांगितला होता. या कारणावरून सून शांतीने अथोनी यांना मारहाण केली.
उपचारासाठी इतका पैसा कुठून आणायचा असे म्हणत भांडण केले. याच रागात सुनेने सासूचा गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Exit mobile version