| पनवेल | प्रतिनिधी |
पाच वर्षाच्या मुलासह आई राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या पतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. मनिषा सोनू पोवल (27, रा.करंजाडे) असे या महिलेचे नाव असून रंग गोरा, अंगाने मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, डोक्याचे केस काळे लांब, नाक सरळ, डोळे काळे आहेत. तर सोबत तिचा 5 वर्षीय मुलगा नक्ष रंग सावळा आहे. त्यांना हिंदी भाषा अवगत आहे. या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार युवराज म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.