| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पाटणसई गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोपाळ गायकर यांची निवड करण्यात आली आहे. पाटणसई ग्रामपंचायतीची 13 ऑगस्टची कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा पाटणसई ग्रामपंचायतीच्या कै.देविदास गणपत गायकर सभागृहात 19 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते मोतीराम गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या ग्रामसभेला रोहा पंचायत समितीचे माजी सभापती असलेले पाटणसईचे ग्रामस्थ सदानंद गायकर, ग्रामसेविका शर्मिला ठाकूर, पोलीस पाटील वैशाली गायकर, शिवराम गायकर, दीपक महाडिक, मंदार कोतवाल आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मोतीराम गायकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.







