पांगलोली येथे मोटरसायकलचा अपघात; दोन सख्खे भाऊ ठार

रमजानच्या सणात धनसे कुटुंबावर दुःखाचा सावट

| आंबेत | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथील दोन तरुणांचा शुक्रवारी (दि.21) रात्री मरियाम खार ते लिपनिवावे हद्दीत मोटारसायकल वरून पडल्याने अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात दोन्ही सख्खे भाऊंना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघातात दोन्ही भावांचे निधन झाल्याने पांगलोली येथील धनसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आफक इनायत धनसे (18) इयत्ता बारावी, तर अरफात इनायत धनसे (14) इयत्ता सातवी, राहणार पांगलोली, ता. म्हसळा शुक्रवारी रात्री आपल्या नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Exit mobile version