सांगोलानजीक अपघातात मोटारसायकल चालक ठार

| सांगोला | प्रतिनिधी |

सांगोला येथून डाळिंब विक्रीकरून मांजरी येथे घराकडे जाणार्‍या मोटारसायकल चालकाला नरुटे वस्ती (सांगोला) नजीक समोरून येणार्‍या वाहनांच्या उजेडात अंदाज न आल्याने रस्त्याकडे उभारलेल्या कंटेनरला पाठीमाघून धडक लागण्याने मोटारसायकल चालक ठार झाला असल्याची घटना घडली आहे. दिलखुश उस्मान मुजावर रा.मांजरी ता.सांगोला यांनी सांगोला पोलीसात कंटेनर चालक विजय मंन्साराम मिश्रा रा. गौरा, ता. चुनार, जि. मिर्झापुर, राज्य उत्तरप्रदेश यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तर अ‍ॅड. उस्मान मुजावर (वय 60) रा . मांजरी ता.सांगोला असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Exit mobile version