। सांगोला । प्रतिनिधी ।
अज्ञात चोरट्यानी सांगोला शहरातील जुन्या एस.बी.आय. बँकेसमोर कृषी केंद्राचे शटर उचकटून सुमारे 6 हजार रुपये किंमतीचे डिव्हीडी आणि 1200 रुपये रोख रक्कम असा एकूण 7 हजार 200 रुपये किंमती मुद्देमाल चोरून नेहला असल्याची घटना दिनांक 9 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अभिनंदन साळुंखे (रा. दत्त नगर, सांगोला) यांनी सांगोला पोलीसात तीन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.