। नवीन पनवेल । वार्ताहर ।
मोटरसायकलने ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुरज वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी टँकर चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज वाघमारे आणि योगेश कातकरी हे बुधवारी (दि. 08) मोटरसायकल (एमएच-46-बीजी-7649)वरून जात होते. ते गंधार ऑईल कंपनीच्या समोर तळोजा एमआयडीसी येथे आले असता रस्त्यावरच एक टँकर (एमएच-48-एजी-8418) अभा होता. अंधारात मोटारसायकल स्वाराला टँकरचा अंदाज न आल्याने थेट टँकरला पाठीमागून धडक दिली. यात सुरज वाघमारे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. टँकर चालकाने कोणत्याही प्रकारचे बोधचिन्ह अथवा सिग्नल लाईट लावलेले नव्हते त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.