। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर गारळ गावाच्या हद्दीत दोन कार आणि एक दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (दि.14) सायंकाळच्या सुमारास गारल फाट्यावर हॉटेल आनंद भुवन समोर मारुती सुझुकी बलेनो (क्र. एमएच 46 डीए 1229) व मारुती सुझुकी व्हॅगनार (क्र. एमएच 08 बीई 7561) तसेच होंडा शाईन (क्र. एमएच 06 बीआर 6826) या वाहनांमध्ये अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अण्णा काळे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात मदत केली. या अपघाताचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.






