। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे-रोहा रस्त्यावर वरवठणे गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात नागोठण्याजवळील वणी येथील दुचाकी चालक मयूर महादेव राऊत (वय 24) या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास घडला.
मयूर वरवठणे आदिवासीवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या पुढे आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ती चुकीच्या बाजूला जाऊन रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या पाण्याच्या मोठ्या पोलादी जलवाहिनीवर जोरात जाऊन धडकली. या अपघातात मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक सचिन निकम अधिक तपास करीत आहेत.
नागोठणेनजीक अपघातात मोटारसायकलस्वार ठार
