गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांची उत्तुंग कामगिरी

वीस हजार फुट उंच माऊंट युनाम शिखर केले सर

| सुधागड-पाली | वार्ताहर |

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. त्यांनी माउंट युनाम हे 20140 फूट म्हणजेच 6111 मीटर उंच शिखर यशस्वीरित्या सर केले आहे. सहा हजार मीटर उंच शिखर सर करण्याची प्रत्येक गिर्यारोहकाची महत्त्वाकांक्षा असते. जवळपास 4 दिवसांच्या कालावधीत 25 किमी चालून अल्पाइन शैलीमध्ये माउंट युनाम शिखरावर पोहोचले. हा आनंद आणि कर्तृत्वाची जबरदस्त भावना अनुभवली असे मॅकमोहन हुले म्हणाले.

युनाम शिखर मोहीम त्यांच्यासाठी खुली आहे जे उंचीचे आव्हान शोधत आहेत. भारतातील सर्वात कठीण ट्रेकपैकी हा ट्रेक आहे. यासाठी शरीर तंदुरुस्त ठेऊन सराव, योग्य काळीज घेत व धीर धरून, दृढ इच्छाशक्ती आणि निश्चयाने अडथळ्यावर मात करत हे शिखर सर केले.

मॅकमोहन हुले, गिर्यारोहक
Exit mobile version