खोपोली पोलिसांचे संचलन    

खोपोली | वार्ताहर |
 खोपोली  शहरात  पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली बाजारपेठेतून गुरूवारी संचलन करण्यात आले. सोमजाईवाडी,खालची खोपोली, खोपोली बाजारपेठ, जैनमंदीर,समाजमंदीर रोडवरून बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून पुन्हा खोपोली पोलिस ठाण्यात समारोप करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, उपपोलिस निरिक्षक सुधाकर लहाने यांनी रूट मार्च नेतृत्व केलं.यावेळी गोपनिय विभागाचे बांगर,कादीर तांबोली यांच्यासह 18 पोलिस काँन्स्टेबल,ठाणे अमंलदार उपस्थित होते. बाजारपेठ होणारी वाहतुककोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीसहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version