उपविभागीय पोलिस अधिकार्यांचे शिक्षकांना आश्वासन
| खोपोली | प्रतिनिधी |
बदलापूर मध्ये शाळेत चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आता खोपोली पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील जि.प.शाळांमधील मुख्याध्यापक आणि संचालकाची बैठक खोपोली पोलिस ठाण्याच्या सभागृहात शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. उपस्थित शिक्षकांना शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने दिलेल्या सूचना सांगत शालेय विद्यार्थीनी आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलिस दल सक्षम उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे शिक्षकांना अश्वासन दिले आहे.
खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील जि.प.67 शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचर बैठक खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत,सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोज ठाकूर,पूजा चव्हाण, खोपोली नगरपरिषदेचे उपमुख्याध्याधिकारी गौतम भगळे,खोपोली नगरपरिषद पठाण उपस्थित होते. शाळेच्या मुख्य गेटसमोरील गर्दी टाळण्यासाठी वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांनी मुख्याध्यापकांना सुचना केल्या. शिक्षकांंनीही अडचणी पोलीस प्रशासनासमोर सांगितल्या.
सर्व शाळा,कॉलेज,महाविद्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ लावण्यात यावेत व सदर सीसीटीव्ही कॅमेर्याची नियमित तपासणी करावी, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह हे वेगवेगळ्या ठिकाणी असावेत, लहान मुलांना वॉशरूम करिता ने आण करण्याकरता महिला मदतनीस यांची नेमणूक करावी, सर्व शाळांमध्ये असलेले शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, स्कूल बस मध्ये विद्यार्थी ने आण करणे करिता महिला मदतनीस यांची नेमणूक करण्यात यावी, शाळा,कॉलेज,महाविद्यालय कॉलेज येथे असणारे पुरुष सफाई कामगार मद्य सेवन करणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच शासन परिपत्राचे काटेकोरपणे पालन करावे असे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले.