चालत्या पीकअपला आग; द्रुतगती महामार्गावरील घटना

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने चाललेल्या महेंद्र पीक अपला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे महामार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. या आगीमध्ये पीक अप जळून खाक झाली असून, गाडीमधील सामानदेखील जळाले आहे. या अपघातात वाहन चालक सुखरूप बचावला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पीक अप क्रमांक एमएच 12 टीव्ही 1503 मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी गाडीमध्ये फ्रंटलाईन कुरियचा माल होता. ही गाडी मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या कि.मी. 45 जवळ आल्यानंतर गाडीचा वाहन चालक कमलेश यादव यांनी गाडी बाजूला थांबवली. कारण गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला होता. धूर पाहिल्यानंतर गाडीतून उतरून यादव यांनी बोनेट उघडले असता शॉक सर्किट होऊन इंजिनजवळ आग लागली होती. हे पाहिल्यानंतर यादव याने गाडीतील पार्सल बॉक्स उतवरण्यास सुरुवात केली. मात्र, यादव एकटा असल्याने केवळ 21 बॉक्स तो उतरवू शकला. त्यानंतर काही सेकंदातच आगीने रुद्र रूप धारण करून गाडीला विळखा घातला आणि गाडी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये गाडीसह गाडीतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version