। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांच्या घरातील चुली पेटण्याऐवजी घरे पेटतील असे काम सरकारने करू नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय जाधव म्हणाले की, औरंगजेबाची कबर तुम्हाला आजच दिसली का? अनेक वर्षापासून ती कबर असून कारवाईच करायची असेल तर कायद्याने करा. सभागृहामध्ये बील चर्चेला आणा, पास करा आणि निर्णय घ्या. परंतु, सरकारला समाजामध्ये भांडण लावून स्वत:ची पोळी भाजायची का? लोकांना गुण्यागोविंदाने नांदू द्यायचे नाही का? तसेच, आज देशातील आणि राज्यातील सत्ताही तुमच्याकडे आहे. मग एवढी भीती का वाटतेय? असा सवाल करत लोकांच्या घरातील चुली पेटण्याऐवजी घरे पेटतील असे काम सरकारने करू नये, असेही संजय जाधव म्हणाले.