हर्षला तांबोळी यांना मिसेस टुरिझम ग्लोब २०२२ अवॉर्ड

| पनवेल । वार्ताहर ।
मिसेस टुरिझम इंटरनॅशनल 2022 ही स्पर्धा नुकतीच थायलंड येथे पार पडली. यावेळी बेस्ट टुरिझम व्हिडिओ अवॉर्ड आणि मिसेस टुरिझम ग्लोब 2022 पनवेलच्या नेरे येथील हर्षला योगेश तांबोळी यांना मिळाले आहेत. नुकत्याच थायलंड येथे मदर हु केअर द वर्ल्ड म्हणजे आई जगाची काळजी कशी घेऊ शकते हे घोषवाक्य घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगातून 23 स्पर्धक यात सहभागी झाले होते. तर भारत देशातून तीन स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात पनवेलच्या हर्षला योगेश तांबोळी यांचा सहभाग होता. यावेळी टॅलेंट राउंड, टुरिझम प्रमोशन करणे, टुरिझम मिनिस्टर भेट, प्रधानमंत्री भेट, थायलंडच्या नागरिकांची भेट, फूड टेस्टिंग व स्पीच घेण्यात आले. 23 महिलांमधून 15 जणींची निवड करण्यात आली. त्यात हर्षला हिला बेस्ट टुरिझम व्हिडिओ अवॉर्ड आणि मिसेस टुरिझम ग्लोब 2022 हे 2 पुरस्कार मिळाला आहे.

Exit mobile version