न.प.कडून गढूळ पाणीपुरवठा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

गेली अनेक वर्षे श्रीवर्धन नगरपरिषदेची नळ पाणीपुरवठा योजना होती; परंतु जलशुद्धीकरण केंद्र मात्र नव्हते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच खा. सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करीत जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण झाले. मात्र, प्रत्यक्षात ते सुरु झाले आहे की अजून त्याचे काही काम बाकी आहे, याबाबत शंका आहे. कारण, अद्याप गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच शहराच्या काही भागात नियमित वेळेमध्ये पाणी येत नाही, अशी तक्रारही नागरिकांची आहे. तरी, नगरपरिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र खर्‍या अर्थाने सुरु झाले आहे की त्यासंबंधीची काही कामे अजून बाकी आहेत याचा खुलासा न.प. प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Exit mobile version