मापुस्कर यांच्या चित्रपटाचा मुहूर्त

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

मॅगीज पिक्चर्सच्या नवीन मराठी चित्रपटाचा मुहूर्त शनिवारी (दि.20) श्रीवर्धन येथील श्री सोमजाई मंदिरात करण्यात आला. या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही. व्हेंटिलेटर चित्रपटाचे निर्माते प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, मधुकर कोटियान, जोगेश भुतानी हे या चित्रपटाचे निर्माते असून प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर हे दिग्दर्शक आहेत. या मुहूर्त प्रसंगी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, मुख्याधिकारी विराज लबडे, डॉ.कौस्तुभ जोशी, साजन मापुस्कर, अभिनेत्री ऋजुता देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version