मुंबई शहर कबड्डीची निवड चाचणी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने पुरुष स्थानिक प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी, महिला गट, पुरुष व्यावसायिक विशेष गट, प्रथम व द्वितीय श्रेणी, तसेच, कुमार आणि कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे दिनांक 30 ऑक्टोंबर पासून आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षापासून मुंबई शहरचे प्रत्येक गटाचे दोन – दोन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ज्या संघाना या निवड चाचणी स्पर्धेत खेळावयाचे आहे आणि ज्यांनी अद्याप आपला प्रवेश अर्ज भरला नसेल अशा सर्व संघानी लवकरात लवकर आपल्या खेळाडूंची नोंद ऑनलाईन करून आपला प्रवेश अर्ज सशुल्क संघटनेच्या कार्यालयात जमा करावा. असे या पत्रकाद्वारे मुंबई शहर संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी प्रसार माध्यमांमार्फत सर्व संलग्न संघाना केले आहे.

Exit mobile version