| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरु आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु असून, याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. दरम्यान, पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा मध्यवर्ती वेधशाळेने दर्शविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी मुंबईसह कोकणातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.
लोकलसेवा विस्कळीत
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईत अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. चर्चगेट स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. तसेच मरीन लाईन्स परिसरात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे ही संत गतीने धावत असल्याचे पाहायला मिळाले. रात्रीही पावसाचा जोर वाढला होता.