लखनौवर 6 विकेट्सने विजय; पूरन आणि मिशेल मार्शची जबरदस्त खेळी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.
एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दणक्यात सुरुवात करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया रचला. नमन आणि विल जॅक्सने मुंबईला विजय मिळवून दिला.
अखेर रियान रिकल्टनने 83 रन्सची आक्रमक खेळी केली. 83 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. अनेक सामन्यांमध्ये खेळू न शकलेल्या रोहितने आजच्या सामन्यात दमदार कमबॅक केले. रोहित शर्माने 44 चेंडूत 84 रन्सची शानदार खेळी केली. तिलक वर्मा लवकर आउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीरने मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर केला.
एलएसजीकडून आवेश खान, मोहसीन खान, मोहम्मद शामीने सुरुवात केली. मात्र 7 ओव्हरपर्यंत मुंबईच्या एकाही फलंदाजाला आउट करणे त्यांना जमले नाही. शतकी भागीदारी झालयावर मोहसीन खानने मुंबईची सलामीची जोडी फोडली. रियान रिकल्टनला 83 रन्सवर मोहसीन खानने आउट केले.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जॉश इंग्लिस सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान जॉश इंग्लिस केवळ 13 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरनने लखनौला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 63 रन्सची खेळी केली. मिशेल मार्शने 44 रन्सची महत्वाची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंत आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. 15 रन्स करून आउट झाला. तर अक्षत रघुवंशी 11 रन्स करून आउट झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये एडन मारक्रम आणि हिम्मत सिंग महत्वाची खेळी केली. एडन मारक्रमने 31 रन्स आणि हिम्मत सिंगने 40 रन्सची खेळी केली. त्यामुळे लखनौने 228 रन्सपर्यंत मजल मारली.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरने सुरुवात केली. मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचवर ए.एम. गझनफरने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉश इंग्लिसला आउट केले. कॉर्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करून सेट झालेल्या निकोलस पूरनला आउट केले. विल जॅक्स या पार्ट टाइम स्पिनरने कर्णधार पंतची विकेट घेतली. तर कॉर्बिन बॉश मिशेल मार्शला आउट केले. रघू शर्माने अक्षत रघुवंशीला आउट केले.
