आयपीएलमध्ये मुंबईची हाराकिरी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीगचा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही. सतत होणारे पराभव, खेळाडूंच्या चुका, ढिसाळा फिल्डींग, यामुळे एकेकाळी 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा यंदा अतिशय खराब परफॉर्मन्स दिसून आला. यामुळे संघ व्यवस्थापन नाराज असून त्याचा फटका आता कर्णधार हार्दिक पंड्याला बसू शकतो.

मुंबई इंडियन्सशी संबंधित तीन व्यक्तींनी सांगितलं की, हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोडावं लागू शकतं. एवढंच नव्हे तर, मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण होणार याबाबत फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरू असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की, हार्दिक पांड्याकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या अफवा का वाढत आहेत? आयपीएल 2026च्या 10 संघांच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर होता, केवळ याच कारणामुळे हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवले जाईल, की यामागे आणखी काही कारण आहे? संघामध्ये यावर चर्चा सुरू होती, असं एका सूत्राने सांगितलं. पांड्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये खूपच खराब कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातील या सर्वात यशस्वी संघाने साखळी फेरीतील 14 पैकी 10 सामने गमावले. त्या 10 पैकी आठ सामने हार्दिकच्या कर्णधारपदाखाली गमावले होते. दुखापतीमुळे हार्दिक आयपीएल 2026 मध्ये चार सामने खेळू शकला नाही.

Exit mobile version