| मुंबई | प्रतिनिधी |
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील सावळा गोंधळानंतर उमेदवार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नमनालाच घडाभर तेल ओतले गेले. या निवडणुकीत गोंधळाचाच मुहूर्त साधल्या गेला. ओबीसी आरक्षण आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून धाकधूक असतानाच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा नारळ कधी फुटणार यावर तुफान चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीला फेब्रुवारी महिन्यात मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडूनच करण्यात येत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी महापालिका निवडणुकीविषयी मोठे भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारीदरम्यान लागण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर, त्यापुढे फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्यात तयारीसाठी अजून दोन महिन्यांचा मोठा कालावधी पक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत?
