। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवडमध्ये जेवण बनवण्याच्या वादातून लोखंडी रॉडचे घाव घालून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पिंपरी पोलिसांनी आरोपी मुकेश हिरा कुसवाह याला अटक केली आहे.
दिपू कुमार असे हत्या झालेल्या तरुणाच नाव असून दोन महिन्यापूर्वीच दिपू कुमार हा चिंचवडमधील व्ही.के.व्ही कंपनीत काम करण्यास आला होता. कंपनीत एकूण पाच जण काम करायचे आणि तिथेच राहायचे. जेवण ही तिथेच बनवायचे. परंतु, शुक्रवारी जेवण बनवण्यावरून मुकेश आणि दिपू यांच्यात वाद झाले. याच रागातून शनिवारी रात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या दिपू कुमारच्या डोक्यात मुकेशने लोखंडी रॉडने वार केले. यात दिपू कुमार याचा मृत्यू झाला. ही सर्व घटना कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मुकेश हिरा कुसवाहला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.