प्रॉपर्टी डिलर्सची हत्या प्रकरण; पाच आरोपी अटक

| नवी मुंबई | वृत्तसंस्था |

नवी मुंबईत दोन प्रॉपर्टी डीलर्सच्या हत्या करण्यात आली होती. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून ही घटना घडल्याचे समजले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रॉपर्टी डीलर आमीर खानजादा आणि सुमित जैन यांची हत्या झाली होती.

खानजादा आणि जैन हे दोघेही नेरुळचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघेही गुरुवारी (दि. 21) कारमधून एका बिझनेस मीटिंगसाठी निघाले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्या नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी त्यांच्या कारमध्ये बसवलेले जीपीएस वापरुन खोपोलीपर्यंत वाहनाचा मार्ग काढला, त्यावेळी त्यांना रक्ताचे डाग, गोळ्यांचा खुणा आणि दोन रिकामी काडतुसे सापडली. जैन यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून खानजादाला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर नेमला होता. त्याचवेळी खानजादा यांच्या हत्येनंतर जैन यांचाही मारेकऱ्यांनी खून केला होता.

23 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकांनी जैन यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पाच जणांना अटक केली त्यानंतर चौकशीदरम्यान विवादित जमिनीच्या व्यवहारावरुन खानजादाला आयुष्यातून संपवण्यासाठी जैन यांनी एकाला कॉन्ट्रॅक्ट दिल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती. जैन याच्या खोट्या व्यवहारांबबात खानजादाला कळताच त्याने जैन याच्याकडे जमिनीच्या सौद्यात हिस्सा मागितला. त्यानंतर जैन यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. मारहाण करुन त्याचं अपहरण करण्याबाबत होता. परंतु, चुकून गोळी खानजादाच्या पायाला लागली. त्यानंतर सुपारीखोरानं खानजादाची हत्या केली. त्यानंतर सुपारीखोरांनी 50 लाखांची मागणी केली. त्यानंतर सुपारीखोर आरोपींना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी जैनच्या पायावर चाकूने वार केला. यानंतर त्याने अपहरणाच्या प्रयत्न खोटा ठरवण्यासाठी स्वत:वर गोळी झाडली.

Exit mobile version