| माणगाव | प्रतिनिधी |
संगनमत करून एकाची हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना बुधवारी (दि.18) सायंकाळी 7 ते रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान विळे आदिवासीवाडी गावच्या हद्दीत विळे हायस्कुल समोरील शेतामध्ये घडली. याबाबतची फिर्याद श्रीधर दगडू मगर (वय-34) रा.तासगाव ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सयाजी धोंडू पवार रा.सणसवाडी ता.माणगाव व आरोपी मुकेश पुतळाजी नलावडे (मुका), गणेश बाबुराव नलावडे दोन्ही रा.सणसवाडी ता.माणगाव हे शेकोटी शेकत होते. त्यांच्यात झालेल्या भांडणाचा मनात राग धरून गुरुवारी (दि.18) रात्री सयाजी धोंडू पवार व आरोपी हे मौजे विळे आदिवासीवाडी येथून दारू पिऊन घरी येत असताना विळे हायस्कूल समोरील शेतामध्ये आले. सयाजी धोंडू पवार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मुकेश पुतळाजी नलावडे व गणेश बाबुराव नलावडे यांनी संगनमत करून हाताबुक्याने व हत्याराने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीमुळे सयाजी मयत झाले.