| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी वेश्वी संकुलात कॉलेजच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पतंग उडवून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतला. दरम्यान, समाज प्रबोधनपर संदेश लिहिलेल्या पतंगांनी आकाशात झेप घेतली.

यावेळी पीएनपी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, संचालक विक्रांत वार्डे, प्रा. रविंद्र पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. तेजस म्हात्रे, इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.