उरणमध्ये युवकाचा खून

| उरण | वार्ताहर |

क्षुल्लक कारणावरुन उरणमधील युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी एका अल्पवयीन युवकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार डाऊरनगरमध्ये बुधवारी सायंकाळी घडला. दीपक दीपचंद चौहान(वय20) असे मृत युवकाचे नाव आहे.


दीपक हा तरुण बुधवारी गावातील नेहाल या मित्राकडे गेला होता.नेहाल यांच्या घरातून इरफान व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला बाहेर बोलावून घेतले.तेथे दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली.त्याचे पर्यवसान हाणामारीतही झाले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दीपकचा मृत्यू झाला. उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मित्र डायमंड याला अटक केली आहे.तर मुख्य आरोपी इरफानचा शोध उरण पोलीस यंत्रणा घेत आहेत.पोलीस उपनिरीक्षक सुहास चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version