मुरुड पोलीस ठाणे बनले स्मार्ट

नागरिकांच्या सेवेसाठी सक्षम …. पो. निशा जाधव

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

स्मार्ट पोलीस स्टेशन्स हा देशातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कामकाजाला गती देण्यासाठी भारत सरकारचा एक मध्यवर्ती प्रकल्प आहे आणि त्यामागील उद्देश सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणे हा आहे. सरकारने मुरुड पोलीस ठाणे अद्ययावत करून जनतेच्या सेवेसाठी सज्ज केले आहे, अशी माहिती मुरुड पो. निशा जाधव यांनी दिली.

स्मार्ट पोलीस ठाण्यांतर्गत गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे नागरिकांना 24 तास सेवा प्रदान करणे, नागरिकांच्या गरजेनुसार त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर करणे आणि त्यात सातत्याने सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पोलिसांना राहण्याची व्यवस्था, पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज असावी, पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ असावा, पोलीस ठाण्याचे सर्व रेकॉर्ड अद्ययावत असावेत, पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना/पीडितांना तात्काळ मदत मिळावी, पोलीस ठाण्यात सुसज्ज असावेत. खेळाचे मैदान कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे, महिलांसाठी स्वतंत्र दालन असणे. नागरिकांच्या सोयीसाठी माहिती व मार्गदर्शन फलक लावणे, पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड तसेच लोकसभागातून मुरुड पोलिसठाण्याचे सुशोभीकरण केले आहे. त्याअंतर्गत सुसज्ज इमारत, खेळाचे मैदान, पार्किंग व्यवस्था, हिरकणी कक्ष, सूचना फलक, नागरिकांच्या जागृतेकरिता हेल्पलाईन नंबर, जनजागृती देणारे चित्र, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय सुविधा, पोलीस ठाण्यात असलेले दत्त मंदिर सुशोभीकरण, लाईट व्यवस्था, अशा सर्व सुविधा पोलीस ठाण्यात करण्यात आल्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्यासाठी संकोच वाटणार नाही, असे पो. निशा जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version