टोकेखारनजीक दरड कोसळली

मुरुडकडे येणारा चौथा मार्ग बंद; भाजी विक्रेता सुदैवाने बचावला
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
रविवारपासून मुरूड तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे तिन्ही बाजूकडून अलिबाग, रोहा, मुंबईत जाण्याचे मार्ग बंद पडलेले असताना, मंगळवारी पहाटे उपलब्ध आगरदंडा- भालगाव-रोहा-इंदापूर मुंबई हा मार्ग मुरूड तालुक्यात सावली, टोकेखारदरम्यान मोठी दरड खाली आल्याने पूर्ण बंद पडला आहे. त्यामुळे मंगळवारी सुरू करण्यात येणारी एसटी बस सेवा तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती मुरूड बस आगार व्यवस्थापक सुनील वाकचौरे यांनी दिली.

केळघर, बोर्ली, सुपेगाव आदी तीन ठिकाणी विविध कारणांमुळे सोमवारपासून एसटी आणि चार व दुचाकी वाहतूक बंद आहे. आता उरलेल्या भालगावमार्गे टोकेखारनजीक दरड खाली आल्याने मुरूडकडे येणे आणि जाणे पूर्णतः अवघड बनले आहे. त्यामुळे औषधे, गंभीर आजारी रुग्ण, प्रवाशांची प्रचंड कुचंबना झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version