मुरुड: पाच ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील कोर्लई, काकळघर, तेलवडे, वावडुंगी, वेळास्ते या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी केली असून, त्याची माहिती मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होईल.

Exit mobile version