पर्यटनासाठी मुरुड किनारे सुरक्षित
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुडला उन्हाळी सुटीसाठी पर्यटकांनी आधीच हॉटेल बुकिंग केले आहे. त्यामुळे यावेळीही उन्हाळी पर्यटन चांगलेच बहरणार असणार अंदाज व्यक्त केला जात आहे.पर्यटनासाठी मुरुडचे किनारे सुरक्षित असल्याचा दावा प्रशासन आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून केला जात आहे.
15 एप्रिलपासूनच पासून पर्यटक मुरुडकडे मोठ्यासंख्येनि वळणार कारण मुरुडच्या परिसरात वाढत्या सुखसोयी ,पर्यटकांना किनार्यावर बोटिंग .समुद्रातील जलदुर्गावर जाण्यासाठी बोटींची सोय. किनार्यावरील बागांचे सुशोभिकारण, सुसज्ज पार्कींगमुळे पर्यटकांना निर्धास्तपणे गाडी किनार्यावर लावून समुद्रात पोहण्यासाठी जात येणार आहे .ह्यावर्षी मुंबई पुणे .नासिक येथून पर्यटक मुरुडला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुरुडला शनिवार-रविवार आणि जोडून सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगच्या वाहनांच्या रांगा, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, बेफिकीर पर्यटकांची कचराबाजी झाली तरी पालिका समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छ करत आहे .किनार्यावर कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात खात भिजतानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होणार ,मुरुड पालिका किनार्यावरील स्टॉल्सधारकांचा कचरा 2 वेळा उचलते त्यामुळे समुद्रकिनारा स्वच्छ राहतो व पर्यटक आनंदाने फिरू शकतात,असे नपा प्रशासनाने सुचित केलेले आहे.
मुरुडला वॉटर पार्क सुरु झाल्याने पर्यटक हॉटेलात 2 दिवस राहण्यासाठी येतात.त्यातील एक दिवस वॉटर पार्कला तर एक दिवस किल्ला व समुद्रात लाटांचा आनंद घेण्यासाठी देतात.किनार्यावरील हॉटेल मालकांना पार्कींचा प्रश्न होता तो आता संपला आहे किनार्यावर 200 गाड्या पार्कींह होणार आहेत .व पर्यटकाना सनसेट पाहण्यासाठी अदयावत बसण्याची सोय होणार आहे .म्हणूच ह्यावर्षी उन्हाळी सुटीत मुरुड फुल्ल होणार