मुरुडची स्वरा केरळात चमकली

कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई


| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे झालेल्या एशियन लेव्हल कराटे अँड कोबुडू चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात मुरुडच्या स्वरा निशांत विरकुड हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले. स्वरा ही मुरुड तालुक्यातील मजगावच्या नाज अकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. एशियन रियु केयु शितो रियु कराटे डू फेडरेशनतर्फे केरळ राज्याचे दळणवळण मंत्री ॲंथनी राजू हे या स्पर्धेचे आयोजक होते. जिमी जॉर्ज इंदूर स्टेडियम त्रिवेंद्रम केरळ येथे ही स्पर्धा 8 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. स्पर्धेतील जवळपास पाचशे स्पर्धकांतून स्वरा विरकुडने सुवर्णपदकासाठी लढत व कथाह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

स्वराला महाराष्ट्र कमिटी अँड ब्लॅक बेल्ट्‌‍स महाराष्ट्र प्रमुख सेन्साय सनी खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. कमिटीच्या अन्य सदस्य सेंसाय नितेश तांबे, आनंद जाधव, पर्वणी चोरघे, तन्वी म्हात्रे, स्नेहा चव्हाण, पायल राठोड, नंदिनी तांबे, कविता खारगावकर, अनुज भोईर, दामोदर खारगावकर, नेहा घोले, प्रगती धुरुप, तन्वी म्हात्रे, नाज अकॅडमी संचालक मंडळचे प्रमुख शफी हसन तांडेल, सचिव वसीम तांडेल, मुख्याध्यापिका मेघा भंडारे, सर्व सदस्य व शिक्षकांनी स्वरांचे अभिनंदन केले.

Exit mobile version