। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले आहे. – छगन भुजबळ, अन्न व पुरवठा विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्यc