। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गानकोकिळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण स्व लतादीदी मंगेशकर यांना पीएनपी नाटयगृहाच्या वतीने गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी ठीक संध्याकाळी 6 वाजता संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मेरी आवाज ही पेहचान है, असे अभिमानाने सांगत गेली सत्तर वर्षाहून अधिक काळ समस्त भारतीयांच्या मनावर आपल्या स्वरांनी मोहिनी घालणार्या गानकोकिळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी मंगेशकर यांनी रविवारी या जगाचा निरोप घेतला आणि स्वररुपी युगाचा अंत झाला. दीदी सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांना पीएनपी नाट्यगृहाच्या वतीने संगीतमय श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी ठीक संध्याकाळी 6 वाजता नाट्यगृहाचे सभासद आणि पदाधिकारी म्हणून आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले आहे.